विज्ञानातील गंमतीजमती -पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते?

नमस्कार बालमित्रांनो आज आपण विज्ञानातील गमतीजमती मध्ये कांहीं प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे पाहणार आहोत आजचा प्रश्न आहे सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो… पण पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. "आपल्याला रोज सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असं दिसतं. पण खरं पाहिलं तर सूर्य हलत नाही… तो एकाच जागी असतो. उलट पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आणि ती फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे! म्हणूनच सूर्य आपल्याला पूर्वेकडून उगवतोय असं दिसतं. हा पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याचा परिणाम आहे. यालाच पृथ्वीचा 'परिभ्रमण' म्हणजेच Rotation असे म्हणतात." तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपणास नक्कीच समजले असेल की पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. भाग 2 --- विज्ञानातील गंमतीजमती 🌈 इंद्रधनुष्य कसा तयार होतो ? "मुलांनो आपणास आकाशात इंद्रधनुष्य दिसतो तेव्हा जणू कुणीतरी रंगांची जादू केलीय असं वाटतं ना? मग हा जादूगार कोण असेल बरं? ही जादू कशाची असेल बरं ? पण ही जादू खरे तर प्रकाशाची आहे! जेव्हा सूर्यप्रकाश पावसाच्या छोट्या–छोट्या थेंबांमध्ये शिरतो, तेव्हा तो थेंबाच्या आत वाकतो — याला म्हणतात अपवर्तन. नंतर प्रकाश थेंबाच्या आतून उडून परत फिरतो — म्हणजे परावर्तन. आणि पुन्हा बाहेर येताना प्रकाश सात सुंदर रंगांमध्ये विभागला जातो. हे लाखो थेंब एकत्र तेच काम करत राहतात… आणि आकाशात तयार होते – निसर्गाचची सर्वात सुंदर अशी कलाकृती… तो म्हणजे ‘इंद्रधनुष्य’!"

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post