SHVR स्वच्छ व हरित शाळा मुल्यांकन 2025-2026

SHVR स्वच्छ व हरित शाळा मुल्यांकन 2025-2026 स्वच्छ एवम हरित विद्यालय मानांकन (SHVR) २०२५-२६ च्या मानांकनाबाबत संदर्भ :- दि.१३/०८/२०२५ रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रशिक्षणातील सूचना. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP- २०२० च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या द्वारा स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ उपक्रमाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या समन्वयाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशातील सर्व शाळांनी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय, खाजगी अनुदानित, खाजगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या (केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेव्दारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या सहा प्रमुख विषयांवर आधारित बार्बीचे स्वयंमूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करावयाचे आहे. १) पाणी २) शौचालये ३) साबणाने हात धुणे ४) ऑपरेशन आणि देखभाल ५) वर्तन बदल आणि क्षमता बांधणी ६) मिशन लाईफ उपक्रम मार्गदर्शक व्हिडिओ शळा रजिस्ट्रेशन करणेसाठी लिंक https://shvr.education.gov.in/resources मार्गदर्शक पीपीटी click here या अनुषंगाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करावयाचे असून जिल्हास्तरावरून दोन जिल्हा नोडल अधिकारी (शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे) व एक प्रशिक्षण समन्वयक यांची नियुक्ती आपल्या मार्फत करण्यात आलेली आहे. स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ अंतर्गत उपरोक्त उपक्रमांची क्षेत्रीय यंत्रणेव्दारे व शाळांव्दारे यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी स्थानिक स्तरावर प्राचार्य, जिल्हा प्रशिक्षण संस्था सर्व आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांन आराखड्यानुसार प्रत्येक टप्यांवरचे नियोजन, संबधित भागधारक घटकांची भूमिका आणि ज याबाबत उद्बोधन प्रशिक्षण कार्यशाळाव्दारे क्षमता बांधणी व उद्बोधन करावयाच्या उद्देशाने स्वच् हरित विद्यालय मूल्यांकन, SHVR, २०२५-२६ च्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेच ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. शासन निर्णय पहा

Post a Comment

Previous Post Next Post