नमस्कार बालमित्रांनो आज आपण विज्ञानातील गमतीजमती मध्ये कांहीं प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे पाहणार आहोत आजचा प्रश्न आहे
सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो… पण पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
"आपल्याला रोज सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असं दिसतं.
पण खरं पाहिलं तर सूर्य हलत नाही… तो एकाच जागी असतो. उलट पृथ्वी स्वतःभोवती फिरते.
आणि ती फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे!
म्हणूनच सूर्य आपल्याला पूर्वेकडून उगवतोय असं दिसतं.
हा पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याचा परिणाम आहे.
यालाच पृथ्वीचा 'परिभ्रमण' म्हणजेच Rotation असे म्हणतात."
तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपणास नक्कीच समजले असेल की
पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
विज्ञानातील गंमतीजमती -पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते?
Suresh Sude
1
513
ReplyDeletePost a Comment