युडायस नंबरवरुन शाळेचे नाव शोधण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा.
१. राज्य निवडण्याची गरज नाही.
२. युडायस कोड टाका
३. कॅप्चा टाका
आणि सबमिट करा बटणावर क्लिक करा
लिंक
https://src.udiseplus.gov.in/
प्रत्येक शिक्षक व मुख्याध्यापक साठी खूप उपयुक्त माहिती आहे
लातूर जिल्हा परिषद शिक्षक संवर्ग 1 बदली यादी
लातूर जिल्हा परिषद शिक्षक संवर्ग 2 बदली यादी
OTT TTMS Online Badali Portal Cadre 4 Update 2025 - ऑनलाइन बदली पोर्टल संवर्ग 4 पसंती क्रम भरताना घ्यावयाची काळजी! बदली पोर्टल लिंक.
OTT TTMS Online Badali Portal Cadre 4 Update 2025 - ऑनलाइन बदली पोर्टल संवर्ग 4 पसंती क्रम भरताना घ्यावयाची काळजी! बदली पोर्टल लिंक.
https://ott.mahardd.com/
बदलीपात्र शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा?
संवर्ग 4 म्हणजेच बदलीपात्र शिक्षकांनी आपला फॉर्म कसा भरावा? याविषयीं अधिकृत माहिती देणारा Video Vinsys द्वारे प्रसिध्द करण्यात आला. बदलीपात्र शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. संवर्ग 4 मध्ये मोडणाऱ्या सर्व बदलीपात्र शिक्षकांनी हा व्हिडिओ अवश्य पाहून आपल्या शंकाचे निरसन करून घ्यावे.
#शिक्षक बदली 2025
#Vinsys
आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट Section मध्ये नक्की विचारा...
*बदली अलर्ट*
✍️ *RRM*
*संवर्ग 4 साठी बदली पोर्टल सुरू*
बदली पोर्टलवर संवर्ग 4 साठी फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे कालावधी 05.08.2025 ते 08.08.2025 आहे तरी संवर्ग 4 मधील बदली पात्र शिक्षक बंधू या कालावधीत आपला फॉर्म पसंतिक्रम भरून फॉर्म आपला सबमिट करू शकतात.
दुस-याचा भरलेला बदली अर्ज कसा पहावा
_*✳️बदली पात्र शिक्षक संवर्ग 4 पसंती क्रम भरताना घ्यावयाची काळजी*
*✳️जिल्हांतर्गत बदली 2025 अपडेट*
*✳️ बदली पात्र शिक्षकांचे महत्त्वाचे टप्पे*
*✳️ बदली पात्र शिक्षकांना बदली करिता प्रशासकीय (पर्याय अ) किंवा विनंती (पर्याय आ) देण्याच्या सुविधेबाबत*
*➡️ 1) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक 5 बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदली मध्ये मोडत असल्यामुळे बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना प्रत्येक बदली पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणारच. प्राधान्यक्रम भरताना आ- विनंती पर्याय निवडणे जास्त सोयीचे ठरते कारण 2018 च्या शासन निर्णयात सेवा जेष्ठ शिक्षकाची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती परंतु 2024 च्या शासन आदेशात तशी तरतूद नसल्यामुळे क्वचित परिस्थितीतच एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केलेला असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कोणीही मागितलेले नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राऊंड मध्ये जावे लागेल*
*➡️ 2) विस्थापित राऊंड मधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीय मध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्यांची शाळा कोणी घेतली नसेल तरच पुन्हा त्यांची शाळा देण्याची शक्यता आहे*
*➡️ 3) बदली पात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायांमध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती*
*✳️बदली पात्र शिक्षकांनी पसंती क्रम भरतांना खालील मुद्द्यांचा विचार करूनच प्राधान्यक्रम भरावा*
*➡️ 1) बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना अ- प्रशासकीय व आ- विनंती असे दोन पर्याय उपलब्ध असतील*
*➡️ 2 ) टप्पा क्र.1, 2, 3 व 4 मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल*
*➡️ 3) जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग 1, 2, व 3 यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्याकरिता दाखवण्यात येतील*
*➡️ 4) बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल*
*➡️ 5) बदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक विस्थापित होतील.*
*➡️ 6) यापूर्वी संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 मधून बदली करिता होकार दिलेल्या शिक्षकांची बदली झालेली नसेल व असे शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध असेल*
*➡️ 7) सर्व शिक्षकांना किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतीवेळी जिल्ह्यातील 30 पेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील*
*➡️ 8) विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल*
*➡️ 9) दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकणार आहात.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*
*➡️ 10) रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे.*
*➡️ 11) बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेले असतील त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये.*
*➡️ 12) या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा*
*➡️ 13) बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागतांना सेवाजेष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो.*
*✳️ बदली पात्र राऊंड मधील एक युनिट स्पष्टीकरण*
*➡️ 1) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय.*
*➡️ 2) बदली पात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरिता जोडीदार बदली पात्र शिक्षक असेल, बदली पात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिट चा लाभ घेऊ शकता*
*➡️ 3) वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.*
*➡️ 4) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही.*
*➡️ 5) जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल.*
*➡️ 6) दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा जेष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही.*
*➡️ 7) बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारांनाही आपल्या सुरक्षेतेसाठी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.*
*➡️ 8) एक युनिट म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही ३० किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल.*
*➡️ 9) पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही.*
*➡️ 10) एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मधून बदली दिली जाईल*
*➡️ 11) पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली देण्यात येईल.*
बदली अपडेट माहिती/Udice number वरुन शाळा शोधणे
Suresh Sude
0
Post a Comment