🏆 इयत्ता ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
शाळास्तर सराव चाचणी क्र. १
पेपर – १ : मराठी व गणित
📚 सराव चाचणी निवडा
खालीलपैकी तुम्हाला सोडवायचा पेपर निवडा.
📖 मराठी – पेपर
झाडे आपली खरी मित्र आहेत. ती आपल्याला सावली, फुले आणि फळे देतात. झाडांमुळे हवा शुद्ध राहते आणि पाऊस पडण्यास मदत होते. आजकाल माणूस स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करत आहे. यामुळे प्रदूषण वाढले आहे आणि प्राण्यांचे निवारे नष्ट होत आहेत. आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि त्यांचे जतन केले पाहिजे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवला पाहिजे.
१) झाडांमुळे कोणती मदत होते?
२) प्राण्यांचे निवारे नष्ट कशामुळे होत आहेत?
३) उताऱ्यातील महत्त्वाचा संदेश कोणता?
खळाळत वाहे छोटी नदी,
तीरावर तिची हिरवी गदी.
पशू-पक्षी येतात पाणी प्याया,
वृक्ष देती त्यांना शीतल छाया.
मुले खेळती पाण्यात छान,
विसरून जाती भूक अन् तहान.
४) नदीच्या तीरावर काय आहे?
५) पशू-पक्षी नदीकाठी कशासाठी येतात?
६) मुले खेळताना काय विसरून जातात?
राजू : अमित, आज तू शाळेत का आला नाहीस?
अमित : माझ्या आजोबांची तब्येत बरी नव्हती.
राजू : डॉक्टरांनी काय सांगितले?
अमित : डॉक्टरांनी दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगितले.
७) संवाद कोणामध्ये आहे?
८) अमित शाळेत का आला नाही?
९) डॉक्टरांनी किती दिवस विश्रांती घेण्यास सांगितले?
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक देशभक्तांनी मोलाचे योगदान दिले. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये ध्वजारोहण केले जाते.
१०) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक ______ यांनी मोलाचे योगदान दिले.
११) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
१२) १५ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये काय केले जाते?
📚 ज्ञानगंगा पुस्तक डेपो
शालेय पुस्तके, वह्या, कला साहित्य व शिष्यवृत्ती मार्गदर्शिका उपलब्ध.
सर्व साहित्यावर २०% सवलत!
ही सवलत ३० जून पर्यंतच लागू आहे.
📍 मुख्य रस्ता, सातारा
१३) वरील जाहिरात कोणाची आहे?
१४) जाहिरातीत किती टक्के सवलत दिली आहे?
१५) सवलत किती तारखेपर्यंत आहे?
🎉 निकाल
🏆 प्रमाणपत्र 🏆
प्राथमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी
यशस्वी सहभागाबद्दल
यांनी मराठी विषयाची सराव चाचणी पूर्ण केली.
🌟 अभिनंदन! पुढील अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟
➗ गणित – पेपर
१६) ३२,४०५ ही संख्या आंतरराष्ट्रीय पद्धतीने कशी लिहाल?
१७) 78,962 ही संख्या देवनागरी अंकात लिहा.
१८) ८५३ + ४२९ = ?
१९) ‘पन्नास हजार नऊशे नऊ’ ही संख्या अंकात लिहा.
२०) ७३,००५ ही संख्या अक्षरी लिहा.
२१) ४ दशहजार + ५ हजार + ३ शेकडे + २ एकक =
२२) ३८,४५२ या संख्येतील ८ ची स्थानिक किंमत किती?
२३) ६५,२९७ या संख्येतील ५ ची स्थानिक किंमत आणि ९ ची दर्शनी किंमत यांचा फरक किती?
२४) ४०,००० + ६०० + ७० + ५ = ?
२५) ८२,४३९ चे विस्तारित रूप कोणते?
२६) ५, ०, ८, ३ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती?
२७) सर्वात मोठी पाच अंकी संख्या – सर्वात मोठी चार अंकी संख्या = ?
२८) ७, २, ९, ४, ६ या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
२९) सर्वात लहान चार अंकी सम संख्या + सर्वात मोठी तीन अंकी विषम संख्या = ?
३०) ४५,३९२ आणि ४५,९३२ यांच्यामध्ये योग्य चिन्ह कोणते?
३१) ३२०५६, ३२५०६, ३२६०५ या क्रमाने मांडलेल्या संख्यांपैकी मधली संख्या कोणती?
३२) खालीलपैकी उतरत्या क्रमाने सर्वात प्रथम कोणती संख्या येईल?
३३) १ ते १०० या संख्यांमध्ये ‘९’ हा अंक एकूण किती वेळा येतो?
३४) १ ते १०० मध्ये एकूण किती दोन अंकी संख्या आहेत?
३५) १ ते १०० मध्ये दशक व एकक स्थानावर समान अंक असलेल्या संख्या किती?
३६) १ ते १०० या संख्यांमध्ये ‘०’ हा अंक असलेल्या संख्या किती?
३७) ९९ – १० = ?
३८) खालीलपैकी विषम संख्या कोणती?
३९) १ ते १०० मध्ये किती दोन अंकी सम संख्या आहेत?
४०) ३५ नंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती?
४१) १ ते १०० मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत?
४२) खालीलपैकी मूळ किंवा संयुक्त नसलेली संख्या कोणती?
४३) खालीलपैकी वर्ग संख्या कोणती?
४४) १५ नंतरची पुढील त्रिकोणी संख्या कोणती?
४५) १ ते ५० मध्ये संयुक्त संख्या किती आहेत?
🎉 निकाल
🏆 प्रमाणपत्र 🏆
प्राथमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी
यशस्वी सहभागाबद्दल
यांनी गणित विषयाची सराव चाचणी पूर्ण केली.
🌟 अभिनंदन! पुढील अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟
Post a Comment