DIKSHA वर AI Saathi Course अनिवार्य!

🚨 शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना 🎓 DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators (शिक्षकांसाठी AI साथी)" ऑनलाइन कोर्स अनिवार्य
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Maharashtra) यांच्या वतीने Kotak Education Foundation यांच्या सहकार्याने "AI Saathi for Educators (शिक्षकांसाठी AI साथी)" हा ऑनलाइन कोर्स विकसित करण्यात आला असून तो DIKSHA Portal वर उपलब्ध करण्यात आला आहे. 📅 कोर्सचे उद्घाटन: १४ जुलै २०२६ 👤 मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते, मंत्रालय, मुंबई येथे. --- 🤖 कोर्समध्ये काय शिकाल? ✅ Artificial Intelligence (AI) म्हणजे काय? ✅ Machine Learning च्या मूलभूत संकल्पना ✅ शिक्षण क्षेत्रातील AI चे प्रभावी उपयोग ✅ AI आधारित उपयुक्त साधनांचा वापर ✅ Responsible AI (सुरक्षित, जबाबदार व नैतिक वापर) ✅ शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात AI चा प्रभावी समावेश --- 📅 महत्त्वाच्या तारखा 🟢 कोर्समध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६ 🔴 कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२६ --- 📲 कोर्स सुरू करण्यापूर्वी 1️⃣ DIKSHA App डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app - Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करा. - नोंदणी करून संपूर्ण प्रोफाइल पूर्ण भरा. - पदनाम उपलब्ध नसल्यास जवळचे पदनाम निवडा. 2️⃣ DIKSHA Courses App डाउनलोड करा - प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर DIKSHA Courses App डाउनलोड करा. 3️⃣ Browser (Laptop/Desktop) वरूनही कोर्स करू शकता - आधी नोंदणी केलेली असल्यास त्याच ई-मेल आयडीने Login करा. - DIKSHA Courses Tab मध्ये जाऊन Search मध्ये "AI Saathi for Educators" शोधा. --- 🔗 कोर्स लिंक http://elearning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252§ion=2514&mode=active#8212 --- 🏆 कोर्स पूर्ण झाल्यानंतर ✅ प्रमाणपत्र (Certificate) डाउनलोड करा. --- 📢 सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करावा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post