📢 भारताची जनगणना २०२७: आता तुम्हीच करू शकता तुमची नोंदणी! 🇮🇳
लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी नागरिकांना 'स्व-गणना' (Self-Enumeration) सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
🔹 महत्त्वाच्या तारखा:
✅ स्व-गणना कालावधी: १ ते १५ मे २०२६
✅ घरयादी व घरगणना टप्पा: १६ मे ते १४ जून २०२६
🔗 कसे कराल नोंदणी?
१. https://se.census.gov.in/ या पोर्टलवर जा.
२. कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा.
३. OTP टाकून भाषा निवडा आणि पिन कोडसह घराचे स्थान निश्चित करा.
४. ३० प्रश्नांची प्रश्नावली भरून 'Submit' करा.
⚠️ लक्षात ठेवा: माहिती सबमिट केल्यावर 'H' अक्षराने सुरू होणारा ११-अंकी SE ID मिळेल. हा आयडी जतन करून ठेवा आणि प्रगणक घरी आल्यावर त्यांना दाखवा...
#जनगणना2026
#latur
तुमच्यासाठी प्रत्यक्ष जणगणना 2026 (Enumerator Schedule) साठी प्रगणकाकडून विचारले जाणारे 34 प्रश्न व्यवस्थित, सोप्या भाषेत खाली दिलेले आहेत.
🏠 जणगणना 2026 – प्रगणक विचारणारे 34 प्रश्न
जनगणना 2026 – विचारले जाणारे प्रश्न (प्रश्न क्र. 1 ते 33)
📍 स्थान व ओळख
इमारत क्रमांक काय आहे?
गणना घराचा क्रमांक काय आहे?
कुटुंबाने स्व-जनगणना (Self Enumeration) केली आहे का?
🏗️ घराची रचना व साहित्य
घराच्या जमिनीचे मुख्य साहित्य कोणते आहे?
घराच्या भिंतीचे मुख्य साहित्य कोणते आहे?
घराच्या छप्पराचे मुख्य साहित्य कोणते आहे?
🏠 घराचा वापर व स्थिती
हे गणना घर कोणत्या प्रकारे वापरले जाते?
(निवास / निवास + इतर / फक्त व्यावसायिक / बंद / संस्थात्मक)
घराची स्थिती कशी आहे?
(चांगले / राहण्यायोग्य / मोडकळीस आलेले)
👨👩👧👦 कुटुंब माहिती
कुटुंब क्रमांक (Auto-generated)
या घरात एकूण किती व्यक्ती राहतात?
👤 कुटुंब प्रमुख माहिती
कुटुंब प्रमुखाचे नाव काय आहे?
कुटुंब प्रमुखाचे लिंग काय आहे?
कुटुंब प्रमुख कोणत्या प्रवर्गात येतो?
(SC / ST / इतर)
🏡 मालकी व खोल्या
घराचा मालकी हक्क कोणाचा आहे?
(स्वतःचे / भाड्याचे / इतर)
कुटुंबाकडे किती निवासयोग्य खोल्या आहेत?
💑 कुटुंब रचना
16.घरात किती विवाहित जोडपी आहेत?
पाणी व मूलभूत सुविधा
प्र.17: पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे?
(नळ पाणी / विहीर / हातपंप / बोअरवेल / नदी / बाटलीबंद / इतर)
प्र.18: पिण्याचे पाणी कुठे उपलब्ध आहे?
घरात / परिसरात
जवळ
दूर
प्र.19: प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे?
(वीज / तेल / इतर / काहीही नाही)
🚽 स्वच्छता व सुविधा
प्र.20: शौचालयाची उपलब्धता आहे का?
फक्त कुटुंबासाठी
सामायिक
सार्वजनिक
नाही (मोकळ्या जागेत)
प्र.21: शौचालयाचा प्रकार कोणता आहे?
(फ्लश / सेप्टिक टँक / खड्डा / उघडा / इतर)
प्र.22: सांडपाणी निचरा व्यवस्था आहे का?
(बंद गटार / उघडे गटार / नाही)
प्र.23: स्नानगृहाची सुविधा आहे का?
आहे (स्वतंत्र खोली)
बंदिस्त जागा
नाही
🍳 स्वयंपाक संबंधित प्रश्न
प्र.24: स्वयंपाकघर आहे का? LPG/PNG जोडणी आहे का?
(स्वतंत्र / घरात / बाहेर + गॅस आहे/नाही)
प्र.25: मुख्य स्वयंपाक इंधन कोणते?
(लाकूड / शेती अवशेष / LPG / इतर)
📺 कुटुंबातील साधने (Assets)
प्र.26: रेडिओ/ट्रान्झिस्टर आहे का?
प्र.27: दूरचित्रवाणी आहे का? असल्यास कशी?
(डिश / केबल / DTH / नाही)
प्र.28: इंटरनेट उपलब्ध आहे का?
(होय / नाही)
प्र.29: संगणक / लॅपटॉप आहे का?
(होय / नाही)
प्र.30: फोन कोणता आहे?
(लँडलाइन / स्मार्टफोन / बेसिक फोन / दोन्ही / काहीही नाही)
🚲 वाहन संबंधित
प्र.31: सायकल / दुचाकी आहे का?
(सायकल / दुचाकी / दोन्ही / नाही)
प्र.32: कार / जीप / व्हॅन आहे का?
(होय / नाही)
🌾 अन्न व संपर्क
प्र.33: कुटुंबातील मुख्य धान्य कोणते?
(तां
दूळ / गहू / ज्वारी / बाजरी / मका / इतर)
प्र.34: मोबाईल क्रमांक (10 अंकी)

Post a Comment