∆________________________∆
*शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करणार - मा.संभाजीराव थोरात तात्या*
∆_________________________
लातूर -लातूर येथील महामंडळ सभेत शिक्षकांच्या टीईटी परीक्षा रद्द करणार, संच मान्यता जीआर दुरुस्ती करायला लावणार व महाराष्ट्रातील कमी पटाची एकही शाळा बंद करू देणार नाही असा शब्द लातूरच्या शिक्षक महामंडळ सभेत माननीय शिक्षकांचे नेते संभाजीराव थोरात तात्या यांचे लातूर मधील भव्य दिव्य अशा शिक्षक महामंडळ सभेत शिक्षकांना आश्वासन.
शिक्षकांच्या टीईटी परीक्षेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली असून ती परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच शिक्षकावरील अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देऊन राजाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी शिक्षकांना आश्वासित केले.
कमी पटाची एकही शाळा बंद पडू देणार नाही, व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देऊ अशा शब्दांत बाळकृष्ण तांबारे यांनी शिक्षकांना अभिवचन दिले
यावेळी महाराष्ट्र राज्य. प्राथमिक शिक्षक संघाचे प्रमुख मार्गदर्शक तथा उद्घाटक *मा.श्री.संभाजीराव (तात्या) थोरात (शिक्षक नेते)* कार्यक्रमाचे अध्यक्ष
*मा.श्री.बाळासाहेब मारणे (राज्याध्यक्ष) विशेष उपस्थिती मा. श्री रावसाहेब रोहोकले प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते श्री. बाळासाहेब झावरे* राष्ट्रीय अध्यक्ष *श्री.आबासाहेब जगताप* राष्ट्रीय उपाध्यक्ष *श्री. बाळकृष्ण तांबारे* राष्ट्रीय महासचिव *श्री ज.म.मोरे* राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष *बलवंत पाटील* राज्य सरचिटणीस *श्री.कैलास दहातोंडे* राज्य कार्याध्यक्ष *श्री. किशन इदगे* राज्य कार्यकारी अध्यक्ष *विलास चौगुले राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम*राज्य कोषाध्यक्ष श्री अनिरुद्ध पवार* राज्य उपाध्यक्ष *श्री.डी.बी. गुंडूरे* विभागीय अध्यक्ष *श्री.आप्पाराव शिंदे* यांची प्रमुख उपस्थिती होती. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत महामंडळ सभेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच लातूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांचा पुरस्काराने सन्मान व गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिस्त व नियमांचे पालन करुन संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा शिक्षक नेते *केशव भैया गंभीरे* यांनी केले शिक्षकांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून जिथे प्रश्न गंभीर तिथे केशव भैया खंबीर असे आश्वासन शिक्षकांना दिले.जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते यांनी लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची एक नंबरची संघटना करण्याचा मनोदय व्यक्त केला
शिक्षक संघटनेत कार्य करणाऱ्या राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय बाळकृष्ण तांबारे सर यांना चळवळ भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी. गुंडुरे सर यांना चळवळ भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे यांनाही चळवळ भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशील शाळा व गुणवंत खालील शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये ज्ञानदेव दुर्गाप्पा दंडगुले, सौ रोहिणी प्रवीण पाटील, जिल्हा परिषद प्रशाला तांदूळजा, गणेश नरसाप्पा कलशेट्टी, पाटील सरस्वती बलभीम, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भेटा, जोगदंड नारायण हरिराम ,भोसले सुनिता रंगनाथराव ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवड, मनोहर कवडेकर , नवलगीरे रेणुका मधुकरराव ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजना, बरदाळे दत्तात्रय अण्णाराव ,स्वामी कांता कंठ्ठया, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणखेड, राठोड प्रेमदास वाल्मीक, मुसणे संध्या रामकिशन ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळहिप्परगा, बालाजी विश्वनाथराव जाधव, मेघा सुळे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागतीर्थवाडी, ज्योती रामेश्वर घोडके, सुप्रिया शंकरराव थेटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगरी , काकडे बळीराम बापूराव ,अनुराधा वलसे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजराज नगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबोटा, काळगे सोमनाथ बाबुराव ,नाटकरे सुनीता प्रल्हाद या सर्व शिक्षकांचा व उपक्रमशील शाळांचा सर्व मान्यवरांचे उपस्थित ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
या महामंडळ सभेत लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली यावेळी विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे यांची तर विभागीय उपाध्यक्षपदी शिवहार स्वामी यांची निवड करण्यात आली लातूर जिल्हा कार्यकारणी मध्ये जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते, जिल्हा सरचिटणीस पदी केशव भैया गंभीरे जिल्हा शिक्षक नेते पदी सुरेश सुडे जिल्हा कार्याध्यक्षपदी राजेश्वर शिंदे कार्यकारी अध्यक्ष एम.एम जाधव जिल्हा कोषाध्यक्षपदी डी.एस धुमाळ,जिल्हा संपर्कप्रमुखपदी अंगद सावंत व राजेसाहेब थळकर प्रसिद्धी प्रमुख सर्जेराव भांगे व प्रदिप ढेंकरे , जिल्हा मार्गदर्शक पदी अंगद कांबळे सिद्धलिंग मुदगडे बालाजी म्हेञे , गोपीनाथ उल्पे, जिल्हा सल्लागार रामकिशन सुरवसे, दत्तात्रय गिरी,प्रताप सोमवंशी प्रदिप निटूरे रवी पटाडे जिल्हा संघटक पदी प्रमोद होनराव ,गणेश डाके सिद्धलिंग मेंडोळे रामेश्वर कोळसुरे बंडू ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष पदी बब्रुवान सोनटक्के, रमेश गोमारे संजय बिरादार दयानंद तळेकर निळकंठ हेंबाडे , संतोष मोगरगे जिल्हा समन्वयक पदी गोविंद हंद्राळे जिल्हा आघाडीच्या लातूर जिल्हा नेते पदी नीता कदम लातूर जिल्हाध्यक्ष पदी मंदाकिनी भालके जिल्हा सरचिटणीस पदी रंजना जगताप जिल्हा कार्याध्यक्षपदी हिरा हेंडगे कोषाध्यक्ष शामल कुलकर्णी प्रसिद्धी प्रमुख पदी छाया पुरी यांच्या निवडी करण्यात आल्या.लातूर महामंडळ सभेचे शाही नियोजन केल्याबद्दल राज्य नेते संभाजीराव थोरात तात्या यांच्याकडून शिक्षक संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते व नूतन सरचिटणीस केशव भैया गंभीरे सर यांचे व सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे मनभरुन कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचलन शिक्षक संघाचे पदाधिकारी डॉ.नागेश पाटील सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी केले.या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील शिक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करणार - मा.संभाजीराव थोरात तात्या*
Suresh Sude
0












Post a Comment