धाराशिव जिल्हा (पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा) हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक जिल्हा आहे. धाराशिव हे शहर या जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. प्राचीन काळापासून यास धाराशिव या नावाने ओळखले जात असल्याचे अनेक शिलालेखांमधील उल्लेखांमधून स्पष्ट होते. ७-८ व्या शतकांतील राष्ट्रकूट काळातील उल्लेख या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस, हैद्राबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकरच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्या गेले. पुढील सुनावणी होईपर्यंत, म्हणजे १० जून २०२३ पर्यंत जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. मात्र शहराचे नाव धाराशिव कायम आहे. [१] यांचे जिल्हा मुख्यालय धाराशिव शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ किमी भाग हा शहरी आहे.
विभागाचे नाव
छत्रपती संभाजीनगर विभाग
धाराशिव
मुख्यालय
तालुके
धाराशिव तुळजापूर • उमरगा लोहारा कळंब भूम वाशी परांड ा
क्षेत्रफळ
- एकूण
७,५६९ चौरस किमी (२,९२२ चौ. मैल)
> नामांतर
महाराष्ट्र राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी राजपत्र प्रकाशित करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जिल्हा असे अधिकृतपणे बदलले आहे. यासोबतच उस्मानाबाद उपविभाग, उस्मानाबाद तालुका आणि उस्मानाबाद गाव/शहर यांचे देखील नावे बदलण्यात आले.
जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
अक्षांश : १७.३५ ते १८.४० उत्तर
रेखांश : ७५.१६ ते ७६.४० पूर्व.
धाराशिव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्याच्या नैऋत्येला आहे. जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात. धाराशिवच्या नैऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहिल्यानगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान डोंगराने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, धाराशिव आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७,५६९ चौरस किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ किमी आहे. (एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१%) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९%).
जिल्ह्याचे हवामान
पाराशिव जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून डवामान मुख्यतः कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण डोत जाते. उन्हाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.
जिल्ह्यातील तालुके
धाराशिव,
तुळजापूर,
उमरगा,
लोहारा,
कळंब,
भूम,
वाशी,
परांडा
तुळजाभवानी मंदिर हे प्रसिद्ध भवानी देवीचे हिंदू मंदिर तुळजापूरात बाला घाटाच्या टेकडीवर आहे. हे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी मंदिरात येत असत. हे भवानीमातेचे मंदिर धाराशिव पासून २५ कि.मी.वर, सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी. वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. परांडा शहरापासून जवळ डोमगाव येथे समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची समाधी आहे. तसेच सोंनारी येथे भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे महाराष्ट्रतील सर्वात मोठी यात्रा येथे भरते आणि ती सात दिवस चालते महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे.
श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर धाराशिव पासून १५ कि.मी. श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमहाराजांचे एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे.
रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते धाराशिव पासून २० कि.मी.च्या अंतरावर सोलापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील येडशी या गावात आहे. येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात. तसेच भरपूर पाऊ पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षण ठरू शकतो. हा डोंगराळ प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे. त्यामुळे प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
इतर पर्यटनस्थळे - संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर, कन्हेरी दत्तमंदिर, तसेच नळदुर्ग येथील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे..
धाराशिव हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातच्या मध्यभागी आहे. दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक परराज्यांतूचन व विदेशातून उरसासाठी येतात.
तसेच तेर (ता. धाराशिव) येथील पुरातणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट
धाराशिव येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. धाराशिव जिल्हा उस्मानाबादी शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आई तुळजाभवानी ही कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील जलदुर्ग आणि परंडा येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून, येथील जलमहाल हा वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदुर्ग जवळ अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, डोमगाव येथील कल्याणस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहेत.
या जिल्ह्यामध्ये परंडा व नळदुर्ग या ठिकाणी किल्ले आहेत. तुळजापूर या ठिकाणी तुळजा भवानीचे भव्य मंदिर आहे. धाराशिव शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बालाघाट डोंगर रागामध्ये वसलेले गाव आहे. त्याजवळ तुळजाभवानी देवीचे मंदिर जवळ लाभले गेले आहे. त्या ठिकाणी प्रसिद्ध असे हतलादेवी मंदिर ही आहे.
धाराशिव जिल्हा तोंडओळख
धाराशिव जिल्हा दक्षिण पठाराच्या क्षेत्रात येतो, मराठवाडा विभागाच्या अतिदक्षिणेकडे १७. ३५ आणि १८.४० उत्तर अक्षाश व ७५.१६ आणि ७६.४० पूर्व रेखांशावर हा जिल्हा वसलेला आहे
ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे
या जिल्ह्यात काही प्राचीन व ऐतिहासिक महत्व असलेली स्थळे आहेत. त्यात प्रामुख्याने धाराशिव लेणी, रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध असलेले तेर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरचा तुळजाभवानी, कुंथलगिरी हे जैनांचे पवित्र सिध्द क्षेत्र. मध्ययुगात महत्वाची भूमिका बजावणारे नळदुर्ग व परंडा येथील किल्ले.

Post a Comment