Marathi story मराठी गोष्टी लहान मुलांसाठी

 Marathi story लहान मुलांसाठी मराठी गोष्टी


Marathi story 1) गर्विष्ठ मोर 

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.

मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.

एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."

करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. 




Marathi story 2 स्वार्थी मित्र

एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे. 


 ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो. 



अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो. 


थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ' अस्वलाने तुला काय सांगितले रे '..? त्यावर शाम उत्तर देतो की , ""त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली. 



लहान मुलांच्या गोष्टी Marathi story 2) वाईट संगतीचे परिणाम

एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.


एक दिवशी शेतकर्‍याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.

त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. 


शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले. 


तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.


Marathi story 3 पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.

पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."


उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"


पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."


उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"


छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला. 



तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.


एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. 


तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला. 


तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. 


एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. 


अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."


तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.


आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे."


"तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. 



तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे


एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते. 


 तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, 



त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला ! 


तात्पर्य:- आपल्या खोटया प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात, ते शेवटी बहुत करून फसतात.


एका जंगलामध्ये सुतार लाकूड तोडायला जात असे. त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती. एके दिवशी सुतार लाकूड तोडत असताना काही माकडांनी पहिले. 


त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले. दुपारच्यावेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो. त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते, म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो. 


जेव्हा माकड त्या सुताराला पहातो आणि घाबरून जातो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो परतुं , त्याच वेळेस माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते आणि त्या माकडाला पळून जाता येत नाही. सुतार तिथे पोहचल्यावर त्याला माकड दिसते. माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो. 


 तात्पर्य -आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये


Marathi story 7)कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. 


थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी न कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल. 



लाकुडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटविलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दुध पाजिले. थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले. लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता. 


एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजराण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला. हे पाहून लाकुडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. 


ज्या लाकुडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला. 


************************* *बोध कथा* ************************* *उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे....* ---------------------------------------- *कथा* एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. *अचानक त्याच्या मनात आले,नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे.* तो नदीवर गेला.हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. *त्याला पोहता येत नव्हते.त्याची धडपड सुरू झाली.* तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. *अखेर,एका साधूने नदीत उडी घेतली.त्या साधूने त्याला वाचविले.काठावर आणले.* काही वेळाने,तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला.*त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या.पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली.* हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले,त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला,*'थांबा,त्यांने स्वत:च्या किंमती एवढेचं बक्षिस दिले आहे.यात त्याची काय चूक?त्याची किंमत एवढीच आहे.'* *बोध* *माणसाची खरी किंमत प्रसंगानेचं कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.*



सिंह आणि उंट एक सिंह त्याच्या तीन मित्रांसोबत एका जंगलात राहत असतो: ते तीन मित्र म्हणजे कोल्हा, कावळा आणि बिबट्या. ह्या मित्रांना कधीही अन्न शोधावे लागत नसे कारण ते वनराजाच्या जवळ राहत होते. एके दिवशी, एक उंट जंगलातून चालताना दिसल्याने ते आश्चर्यचकित होतात. हा प्राणी वाळवंटात राहतो आणि इथे जंगलात कसा असे त्यांना वाटते. उंट हरवल्याचे त्यांच्या लक्षात येते. सिंह त्याला संरक्षण आणि आश्रय देतो. एकदा काही हत्तीच्या सोबत झालेल्या लढाईत शक्तिशाली सिंहाला दुखापत होते. शिकार करता येत नसल्याने सिंह आणि त्याचे मित्र भुकेले असतात. हे तीन मित्र सिंहाला उंटाला खाऊ असे सुचवतात. परंतु सिंह उंटाला मारण्यास तयार नसतो कावळा, बिबट्या आणि कोल्हा प्रत्येकाने स्वतःला, सिंहाला अन्न म्हणून देऊ केले, परंतु सिंहाने ते नाकारले. उंटाने हे पाहिल्यावर लगेचच स्वतःला सिंहापुढे खाण्यासाठी देऊ केले. सिंहाने लगेच त्याला मारून खाल्ले. बोध: वैयक्तिक फायद्यासाठी श्रीमंत किंवा शक्तिशाली लोकांना वेठीस धरणाऱ्या धूर्त लोकांवर तुम्ही विश्वास ठेवणे योग्य नाही. कावळे आणि नाग एका छोट्याशा राज्याच्या जवळ असलेल्या जंगलात एका वटवृक्षावर एक नाग आणि दोन कावळे राहत होते. एकदा कावळे अन्नाच्या शोधात घरटे सोडून गेल्यावर, दुष्ट कोब्रा कावळ्यांची अंडी खातो. कावळे हतबल होऊन दुखावले जातात. ते एखाद्या कोल्ह्याचे मार्गदर्शन घेण्याचा विचार करतात. एक कावळा कोल्ह्याचे ऐकतो आणि पहारेकरी बघत असताना राणीचे मौल्यवान दागिने चोरण्यासाठी राजवाड्याकडे निघतो. कावळा काळजीपूर्वक त्याच्या घरट्याकडे जातो आणि रक्षकांना त्याच्या मागे यायला सांगतो. वटवृक्षाच्या पोकळीत साप राहत असतो, तिथे आल्यावर कावळा तिथे हार टाकतो, जेव्हा रक्षकांना छिद्रामध्ये साप सापडतो तेव्हा ते त्याला ठार मारतात आणि हार हिसकावून घेतात. कावळे कोल्ह्याचे आभार मानून आनंदाने जगू लागतात. बोध: पुरेशा बुद्धीने, अगदी भयंकर शत्रूंचाही पराभव केला जाऊ शकतो चिमणी आणि माकड ही कथा एका माकडाची आणि वटवृक्षावर राहणाऱ्या चिमणा चिमणीच्या जोडीबद्दल आहे. एकदा पाऊस पडत असल्याने माकड थंडीने कुडकुडत होते. एका चिमणीने माकडाला संकटात पाहिले आणि त्याला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे घर बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. माकडाला हा सल्ला दिल्यानंतर त्याचा गैरसमज झाला. आणि त्याने चिमणीचे घरटे नष्ट केले. ह्या कथेवरून आपण हे शिकतो की ज्यांना मदतीची गरज आहे असे लोक सल्ल्याला क्वचितच महत्त्व देतात. बोध: चिमणीच्या ह्या कथेवरून आपण असे शिकतो की ज्या लोकांना गरज आहे फक्त अशा लोकांनाच सल्ला द्या. सल्ल्यासाठी हे लोक खरोखरीच पात्र असणे गरजेचे आहे. साधू आणि उंदीर एका छोट्या समुदायातील मंदिराची देखभाल एका साधुने केली होती. त्याने भिक्षा गोळा केली आणि त्यातील काही भाग मंदिराच्या साफसफाईसाठी मदत करणाऱ्यांना दिला. दुर्दैवाने, एक उंदीर साधूचे अन्न चोरत राहिला आणि त्याला मंदिरात दुःख देत राहिला. त्याने कितीही प्रयत्न केले तरी साधू उंदरापासून मुक्त होऊ शकला नाही. छतावरून लटकवलेल्या मातीच्या भांड्यात अन्न टाकले तरी उंदीर ते चोरत राहिले. वैतागलेल्या, साधूने मित्राकडून सल्ला मागितला. साधूच्या मित्रांनी त्याला उंदराच्या अन्नाचा स्रोत शोधून काढून टाकण्याचा सल्ला दिला. आजूबाजूच्या परिसराचा कसून शोध घेतल्यानंतर, साधूंनी उंदराची अन्नाची जागा शोधून नष्ट केली. अन्नाचा पुरवठा संपल्यामुळे उंदीर अन्न शोधण्यासाठी छतावर जाऊ शकत नव्हता. जेव्हा उंदीर अशक्त झाले तेव्हा संन्याश्यानी उंदरांना पकडले आणि मंदिरापासून दूर फेकले. जखमी उंदीर मंदिर सोडून गेला आणि परत आला नाही. बोध: शत्रूवर मात करण्यासाठी, त्याच्या शक्तीच्या स्त्रोतावर प्रहार करा. चार मित्र आणि एक शिकारी एक उंदीर, एक कावळा, एक हरिण आणि एक कासव असे सर्व मित्र होते. ते जंगलात राहून समाधानी होते. एके दिवशी चुकून हरीण शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडल्यावर मित्रांनी त्याला वाचवण्याची योजना आखली. धडपड केल्यानंतर आणि वेदना होऊ लागल्यावर, हरीण डोळे उघडे ठेवून, असल्यासारखे पडून राहते. मग मेलेल्या प्राण्याला करतात तसे कावळे आणि इतर पक्षी हरणावर बसतात आणि त्याच्यावर टोचे मारू लागतात. शिकाऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी कासव लगेच शिकाऱ्याच्या वाटेवर जाते. हरीण मेले आहे असे वाटल्याने शिकारी कासवाचा पाठलाग करतो. कावळा ताबडतोब कासवाला उचलतो तर उंदीर हरणांना सोडवण्यासाठी जाळे कुरतडतो बोध: टीमवर्क केल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. संगीतमय गाढव संगीतमय गाढव दिवसभराच्या कठोर परिश्रमानंतर, धोब्याचे गाढव हिरव्यागार शेतात चरायला मोकळे होते. शेतात चरण्याऐवजी हे गाढव गावकऱ्यांच्या शेतात डोकावत असे आणि घरी जाण्यापूर्वी उगवलेल्या भाज्या खात असे. गाढव एकदा एका कोल्ह्याला भेटले आणि ते दोघे चांगले मित्र बनले. त्यांनी एकत्र शिकार करण्याचा निर्णय घेतला आणि लठ्ठ गाढव भाज्या खाण्यासाठी कुंपण तोडेल, तर कोल्हा शेतातील प्राण्यांची शिकार करेल असे ठरले. एके रात्री गाढवाने कोल्ह्याला सांगितले की त्याला गाणे गायचे आहे. आपण पकडले जाऊ म्हणून कोल्ह्याने त्याला गाणे म्हणू नकोस अशी विनंती केली. मात्र, गाढवाने नाराज होऊन गाण्याचा हट्ट धरला. त्याने तोंड उघडले आणि जोरात आवाज काढू लागला आणि कोल्हा लगेच पळून गेला. गाढवाचा आवाज ऐकून शेतकरी धावत बाहेर आले आणि भाजी खाल्ल्याबद्दल त्याला बेदम मारहाण केली. शेतकर्‍याने गाढवावर तोफ बांधली आणि गाढव घरी जात असताना, कोल्ह्याने गाढवाची चेष्टा केली. गाणे गेल्याबद्दल गाढवाला ती भेट म्हणून दिल्याची थट्टा केली. बोध: प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आणि स्थान असते. सुज्ञ मंत्र्यांचा सल्ला घुबडांच्या टोळीने एका रात्री जंगलात काही कावळ्यांवर हल्ला केला आणि त्या सर्वांना ठार मारले. कारण कावळे रात्री नीट पाहू शकत नाहीत आणि पुन्हा हल्ला करू शकत नाहीत. ही बातमी ऐकून कावळ्यांचा राजा इतका दुःखी झाला कि, तो आपल्या ज्ञानी वृद्ध मंत्र्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी गेला. मंत्र्याने त्याला सल्ला देऊन परत पाठवले. दुसर्‍या दिवशी, कावळे घुबडाच्या गुहेत गेले आणि त्यांनी एक नाट्यमय कार्यक्रम सादर केला! एका कावळ्याने घुबडांची स्तुती करण्याचे नाटक केले आणि दुसऱ्याने त्याला मारले! हे पाहून घुबड राजाला वाटले की हा कावळा घुबडांच्या बाजूने आहे. कावळा घुबडांसोबत राहिला, एके दिवशी पहाटे कावळा उडून गेला आणि आपल्या मित्रांच्या मदतीने घुबडाच्या गुहेच्या प्रवेशद्वाराला आग लावली! घुबड हे निशाचर प्राणी असल्याने ते झोपेत होते आणि ते सर्व मारले गेले! बोध: तुमच्या मित्रांना जवळ ठेवा, परंतु तुमच्या शत्रूंना आणखी जवळ ठेवा शीर्षक: "कबुतर, मुंगी आणि शिकारी कबुतर झाडावर बसलेले होते. तेव्हा एका शिका-याने त्यावर नेम धरला आणि तो हळूच दबकत चालला होता... हे सगळं दूरून मुंगी पाहत होती. ती पटकन रांगत रांगत शिकाऱ्याजवळ आली ...आणि त्याच्या पायाला जोरात चावलं! शिकारी किंचाळला! त्याचा तोल गेला... आणि कबुतर सावध झालं! ते झटकन उडालं आणि वाचलं! कांहीं दिवसांनी एक मुंगी खूप तहानलेली होती. ती पाणी शोधत नदीकाठी आली. पाणी पित असताना तिचा पाय घसरला... ...आणि ती थेट पाण्यात पडली! ती धडपडू लागली… बुडायची वेळ आली होती. तेवढ्यात झाडावर बसलेलं एक कबुतर हे सगळं पाहत होतं. कबुतराने झाडावरून एक मोठं पान तोडलं ...आणि ते पाण्यात टाकलं. मुंगीने ते पान पकडलं आणि हळूहळू किनाऱ्यापर्यंत पोहोचली. तिचं प्राण वाचलं! --- शेवटी… "कधी कधी लहान मदतही मोठं जीवन वाचवते!" "ज्याने आपली मदत केली, त्याची परतफेड जरूर होते!"

Post a Comment

Previous Post Next Post