प्राचार्य,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
२. शिक्षणाधिकारी, प्राथमिक / माध्यमिक (सर्व)
विषय- सन. २०२६-२७ मध्ये इ.३ री, ४ थी व ६ वी साठी सेतू अभ्यास अंमलबजावणीबाबत. तसेच इ. ६ वी प्रशिक्षण घटकसंघ वितरणाबाबत.
संदर्भ- १. शासन निर्णय क्रमांक-२०२५/प्रक्र.९४/एस.डी.४ दि.१४/०७/२०२५ २. राज्यस्तरीय समन्वय समिती बैठक दि.०१/०६/२०२६,
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणी अंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि. १४/०७/२०२५ अन्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येत आहे. सन. २०२६-२७ पासून इयत्ता दुसरो, तिसरी, चौथी, सहावी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
नवीन अभ्यासक्रम प्रथमच लागू होणान्या इयत्ता (३री, ४थी, ६वी) मध्ये जाणाऱ्या विद्याथ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी सुकर व्हावी म्हणून तसेच, नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शैक्षणिक पातळी, भाषिक समज आणि स्व. अभ्यासाची सवय यांची जुळवणूक सहज व्हावी यासाठी २१ दिवसांचा सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ३ री, ४ थी, ६ वो वर्गासाठी सदर सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेतू अभ्यासाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील शिक्षकांसाठी याद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत (सोबत संलग्न), सदर सूचना आपल्या अधिनस्त सर्व शाळांपर्यंत पोहोचवाव्यात. सेतू अभ्यास अंमलबजावणी सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुव्यवस्थितपणे व वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रभावी पर्यवेक्षण करावे,
सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरापर्यत पोहचविण्यात येत आहेत. त्यांचे वितरण शिक्षणाधिकारी यांनी आपल्या यंत्रणेमार्फत शाळांपर्यंत तात्काळ पूर्ण करावे. त्यासोचत इ. ६ वी चे शिक्षक प्रशिक्षण घटकसंच जिल्हा स्तरापर्यंत पोचविण्यात येत आहेत, ते आपल्या ताब्यात ठेवून जिल्हास्तर प्रशिक्षणावेळी त्याचा उपयोग करावा, तालुकानिहाय वितरण तपशील यासोबत देग्ग्राव आलेला आहे. सोबत- शिक्षकांसाठी सेतू अभ्यास मार्गदर्शक सूचना व तपशील.
प्रत,
(डॉ. हेमंत वसेकर) संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र राज्य
) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार निर्मित नवीन अभ्यासक्रमातील बदलामुळे जुन्या व नवीन संकल्पना, क्षमता, अध्यययन निष्पती यामध्ये योग्य सांगड घालण्यासाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे.
2) सेतू अभ्यास उपलब्धताः सदर सेतू अभ्यास परिषदेच्या www.man.ac.in संकेतस्थळावर PDF स्वरुपात उपलब्ध करण्यात आला असून सर्वांसाठी खुला आहे, त्याचा शिक्षकांनी उपयोग करावा, सेतू अभ्यास पुस्तिकांची प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
साहित्य/ पुस्तिका
माध्यम
१ सेतू अभ्यास (इ. तिसरी- सर्व विषय)
सेतू अभ्यास (इ. चोधी- सर्व विषय)
सेतू अभ्यास (इ. सहावी- भाषा)
मराठी व उर्दू माध्यम
मराठी व उर्दू माध्यम
मराठी व उर्दू माध्यम
४ सेतु अभ्यास (इ. सहावी- गणित व विज्ञान) मराठी व उर्दू माध्यम
५ सेतू अभ्यास (इ. सहावी- सामाजिक शास्त्रे)
मराठी व उर्दू माध्यम
3) इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी भाषा २१ आणि मराठी भाषा २२ यांसाठी केवळ PDF स्वरुपात पुस्तिका स्वतंत्रपणे
संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. अन्य माध्यमांनी मराठी माध्यमातील सेतू अभ्यास पुस्तिकेचा उपयोग करावा,
4) अंमलबजावणीः सेतु अभ्यासासाठी २१ दिवसांचा कालावधी विहित करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या सुरुवातीस म्हणजेच शाळा सुरु झाल्यापासून २१ दिवसांमध्ये हा सेतू अभ्यास संबंधित इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यावा.
5) अध्ययन निष्पत्तीवर भरः सेतू अभ्यासातील प्रत्येक कृतिपत्रिका सोडवून घेताना त्यातील क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य होत आहेत याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक कृतिपत्रिकेच्या सुरुवातीला पाठ्यक्रमातील घटकांशी संबंधित अभ्यासक्रम ध्येय, क्षमता विधाने व अध्ययन निष्पत्ती देण्यात आलेल्या आहेत,
6) संकल्पनांची समजः विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची व्याप्ती या अभ्यासात अधोरेखित केलेली आहे, त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या
स्तरानुसार अध्यापन करावे, कृतिपत्रिकेतील केवळ उत्तरे लिहून न घेता विद्याध्यांच्या ज्ञान, आकलन आणि कौशल्याचा विकास होईल अशा पद्धतीने संकल्पनांची मांडणी समजावून सांगावी.
7) शिक्षकांनी सुलभकाच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, विद्यार्थी स्वतः कृती करतील यावर भर देणे अपेक्षित आहे. सेतू अभ्यास अंमलबजावणी वर्षारंभी वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
8) सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर इयत्तेच्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनाला सुरुवात करावी

Post a Comment