*तंत्रस्नेही व विद्यार्थी प्रिय शिक्षक सुरेश सुडे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला*
________________________________________
पनवेल -आज पनवेल जिल्हा रायगड येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक/शिक्षिका पुरस्कार गौरव सोहळ्यामध्ये लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी येथे कार्य करणारे तंत्रस्नेही व विद्यार्थी प्रिय शिक्षक सुरेश सुडे यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
*मा.श्री बाळाराम पाटील*साहेब
( माजी शिक्षक आमदार कोकण विभाग )
*मा श्री. प्रवीणजी स्वामी साहेब*
(आमदार उमरगा विधानसभा )
*मा. दत्तात्रय सावंत साहेब*
(माजी शिक्षक आमदार )
*मा.अनिलजी नाचपल्ले* (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ )
*मा श्री संतोष भोजने* (राज्यसरचिटणीस राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ)
*श्रीमती रेखा सुडे मॅडम*
( महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ)
*श्रीमती जाधव मॅडम*
(राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संघ)
लातूर जिल्हाध्यक्ष बालाजी चैटमपल्ले , हिंगोली जिल्हाध्यक्ष लहू राक्षे व इतर उपस्थित राज्य राज्य पदाधिकारी व इतर सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष
या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातून आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनींचा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार व व डॉक्टर पंजाबराव देशमुख आदर्श शिक्षक पुरस्कार अशा पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये शिक्षक बांधवांच्या विविध प्रश्न संदर्भाने ठराव मांडून येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडून ते ठराव मंजूर करण्यात येतील असे अभिवादन माननीय आमदार प्रवीण जी स्वामी यांनी शिक्षक बांधवांना दिले मी स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची मला जाण आहे त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न हे माझे प्रश्न समजून मी विधानसभेत नक्कीच शिक्षकांच्या बाजूने आवाज उठविणे असे अभिवाचन याप्रसंगी त्यांनी शिक्षकांना दिले अशा या भव्यदिव्य अशा सोहळ्यास महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांची उपस्थिती होती






Post a Comment